Posts

वासेपूर मित्रमंडळ महाशक्तीत विलीन - सरदार खानवरील विनयभंगाचा गुन्हा मागे

Image
जुने वासेपूर, विशेष प्रतिनिधी येथील वासेपूर मित्र मंडळ सत्ताधारी महाशक्ती पक्षात विलीन करण्याची घोषणा मंडळाचे अध्यक्ष सरदार खान यांनी केली. दोनच दिवसापूर्वी सरदार खान यांच्यावरील विनयभंगाचा गुन्हा संबंधित महिलेने मागे घेतल्यानंतर या घडामोडी घडलेल्या आहेत.  वासेपूर येथील ज्येष्ठ नेते आणि सरदार खान यांचे स्पर्धक रामाधीर सिंह यापूर्वीच महाशक्तीत सामील झाले आहेत, त्यानंतर सरदार खानही महाशक्तीत आल्याने वासेपूरमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.  वासेपूरचा विकास गेली अनेक वर्षे रखडलेला आहे, महाशक्तीत विलीन झाल्यानंतर वासेपूरच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, विविध योजना मागे लावता येतील, यासाठीच महाशक्तीत आपणे मंडळ विलीन केल्याचे सरदार खान यांनी थिल्लर टाइम्सशी बोलताना सांगितले. वासेपूरच्या राजकारणात येथून पुढे रामाधीर सिंह यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतले जातील असे त्यांनी सांगितले. एक प्रकारे वासेपूरमध्ये आता समझोता एक्सप्रेस सुरू होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.  या संदर्भात रामाधीर सिंह यांच्याशी आम्ही चर्चा केली. सरदार खान यांच्या मंडळाचे पक्षात विलीनकरण झाल्याने पक्षाला...

आई तुझे वय ४२, तू कधी थांबणार? पलक तिवारीचा आईवर हल्लाबोल. बिकिनी बॉडी संघटनेत उभी फूट?

Image
  मालदीव खुर्द, थिल्लर टाईम्स प्रतिनिधी सरकारी नोकर वयाच्या ५८व्या वर्षी निवृत्त होतात, पण तू कधी थांबणार आहेस, तुझे वय 42 झाले तू आता थांबले पाहिजेस, अशा शब्दात पलक तिवारी हिने आई श्वेता तिवारी हिच्यावर टीका केली.   श्वेता तिवारी करत असलेल्या सततच्या हॉट फोटोशूटमुळे आपल्याला इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स मिळत नाहीत, तसेच सिनेइंडस्ट्रीत पुरेसा भाव मिळत नाही, अशी पलक तिवारीची तक्रार आहे. यातूनच पलकने आज बंडांची बिकिनी फडकावली. मालदिव खुर्द येथे तिने फोटोशूटनंतर झालेल्या एका सभेत आईवर प्रहार केले. या सभेत पलक तिवारी भावनिक झाली. तिच्या डोळ्यातून आलेल्या आश्रूंमुळे तिचा डिपनेक गाऊन चांगलाच भिजला होता. (भिजलेल्या गाऊनमध्ये ती जास्तच हॉट दिसत होती, असे आमचे प्रतिनिधी सांगतात.) कुणाचे फोटो जास्त हॉट, यावरून श्वेता आणि पलक यांच्यात गेली काही दिवस वाद सुरू आहे. श्वेताने यापूर्वी बऱ्याच वेळा हॉटफोटोशूट थांबवण्याचा शब्द दिला होता, पण प्रत्यक्षात या संबंधी तिने वेगळीच भूमिका घेतली अशी तक्रार पलकची आहे. "2020ला हॉटफोटोवरून आमची एक बैठक झाली होती. त्या वेळी बिकिनी विक्रेते संघटनेचे पदाधिकारीही ह...