वासेपूर मित्रमंडळ महाशक्तीत विलीन - सरदार खानवरील विनयभंगाचा गुन्हा मागे




जुने वासेपूर, विशेष प्रतिनिधी





येथील वासेपूर मित्र मंडळ सत्ताधारी महाशक्ती पक्षात विलीन करण्याची घोषणा मंडळाचे अध्यक्ष सरदार खान यांनी केली. दोनच दिवसापूर्वी सरदार खान यांच्यावरील विनयभंगाचा गुन्हा संबंधित महिलेने मागे घेतल्यानंतर या घडामोडी घडलेल्या आहेत. 




वासेपूर येथील ज्येष्ठ नेते आणि सरदार खान यांचे स्पर्धक रामाधीर सिंह यापूर्वीच महाशक्तीत सामील झाले आहेत, त्यानंतर सरदार खानही महाशक्तीत आल्याने वासेपूरमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. 




वासेपूरचा विकास गेली अनेक वर्षे रखडलेला आहे, महाशक्तीत विलीन झाल्यानंतर वासेपूरच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, विविध योजना मागे लावता येतील, यासाठीच महाशक्तीत आपणे मंडळ विलीन केल्याचे सरदार खान यांनी थिल्लर टाइम्सशी बोलताना सांगितले. वासेपूरच्या राजकारणात येथून पुढे रामाधीर सिंह यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतले जातील असे त्यांनी सांगितले. एक प्रकारे वासेपूरमध्ये आता समझोता एक्सप्रेस सुरू होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 




या संदर्भात रामाधीर सिंह यांच्याशी आम्ही चर्चा केली. सरदार खान यांच्या मंडळाचे पक्षात विलीनकरण झाल्याने पक्षाला बळकटी येईल, तसेत अनेक वर्षं सुरू असलेला संघर्ष संपले असे सांगितले. “आमच्यासाठी पक्षाचा आदेश महत्त्वाचा असतो. पक्ष जो निर्णय देईल तो आम्ही मान्य करू,” असे ते म्हणाले. 


सरदार खान यांच्यावरील विनयभंगाचा गुन्हा मागे 


सरदार खान यांच्यावर काही वर्षांपूर्वी एका महिलने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा सदर महिलने नुकताच मागे घेतला आहे. ही महिला सकाळी कपडे धूत असताना सरदार खान तिथे आले आणि या महिलेचा हात पकडून ‘तू इतकी मोठी झालीस, अजून लग्न का केले नाहीस?’ अशी विचारणा केली होती. तसेच दुसऱ्या दिवशी ही महिला कपडे धूत असताना सरदार खान तिच्या समोरून फक्त टॉवेलवर फिरत होते, यामुळे या महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य घडले होते. या प्रकरणाची जोरदार चर्चा वासेपूरमध्ये झाली होती. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला होता, त्यातून सरदार खान चांगलेच अडचणीत आले होते. शिवाय सरदार खान यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी महाशक्तीच्या नेत्यांना आंदोलन ही केले होते.







पण या महिलेचे ही तक्रार आता मागे घेतली असल्याने याची उलटसुलट चर्चा वासेपूरमध्ये रंगली होती.  


आपुलकीने विचारणा, वाईट हेतू नाही - सरदार खान 




संबंधित महिलेचा विनयभंग करण्याचा कोणताच हेतू नव्हता, तिच्या लग्नाबद्दल आपण आपुलकीने विचारणा केली होती, असे सरदार खान यांनी सांगितले. तसेच संबंधित महिलेची तयारी असेल तर तिच्याशी लग्नही करू असे ते म्हणाले आहेत.



Comments

Popular posts from this blog

आई तुझे वय ४२, तू कधी थांबणार? पलक तिवारीचा आईवर हल्लाबोल. बिकिनी बॉडी संघटनेत उभी फूट?