आई तुझे वय ४२, तू कधी थांबणार? पलक तिवारीचा आईवर हल्लाबोल. बिकिनी बॉडी संघटनेत उभी फूट?
मालदीव खुर्द, थिल्लर टाईम्स प्रतिनिधी
सरकारी नोकर वयाच्या ५८व्या वर्षी निवृत्त होतात, पण तू कधी थांबणार आहेस, तुझे वय 42 झाले तू आता थांबले पाहिजेस, अशा शब्दात पलक तिवारी हिने आई श्वेता तिवारी हिच्यावर टीका केली.
श्वेता तिवारी करत असलेल्या सततच्या हॉट फोटोशूटमुळे आपल्याला इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स मिळत नाहीत, तसेच सिनेइंडस्ट्रीत पुरेसा भाव मिळत नाही, अशी पलक तिवारीची तक्रार आहे. यातूनच पलकने आज बंडांची बिकिनी फडकावली. मालदिव खुर्द येथे तिने फोटोशूटनंतर झालेल्या एका सभेत आईवर प्रहार केले. या सभेत पलक तिवारी भावनिक झाली. तिच्या डोळ्यातून आलेल्या आश्रूंमुळे तिचा डिपनेक गाऊन चांगलाच भिजला होता. (भिजलेल्या गाऊनमध्ये ती जास्तच हॉट दिसत होती, असे आमचे प्रतिनिधी सांगतात.)
कुणाचे फोटो जास्त हॉट, यावरून श्वेता आणि पलक यांच्यात गेली काही दिवस वाद सुरू आहे. श्वेताने यापूर्वी बऱ्याच वेळा हॉटफोटोशूट थांबवण्याचा शब्द दिला होता, पण प्रत्यक्षात या संबंधी तिने वेगळीच भूमिका घेतली अशी तक्रार पलकची आहे. "2020ला हॉटफोटोवरून आमची एक बैठक झाली होती. त्या वेळी बिकिनी विक्रेते संघटनेचे पदाधिकारीही हजर होते. त्यात आईन स्पष्टच सांगितले होते, की या पुढे बिकिनी फोटोशूट करणार नाही. पण आईने हा शब्द फिरवला. बिकिनी सोडून तिने साडीतील हॉट फोटोशूट सुरू केले. यावर २०२१ला मी पुन्हा तक्रार केली यावेळी साडीविक्रेत संघटनेचे काही पदाधिकारी सोडले तर आईबरोबर कुणीही नव्हते," असे पलक म्हणाली.
आईच्या सततच्या हॉटफोटो शूटमुळे किसी का भाई किसी की जान या सिनेमात माझा रोल पाहण्यासाठी कुणी फिरकले नाही, असेही पलक म्हणाली.
"जर बिकिनी घालताना किंवा हॉट फोटोशूट देताना काही चुकले तर आईने कानाला धरून सांगावे. त्यासंबंधी दुरुस्ती करून पुढे जाईन. आईने मला आशीर्वाद द्यावेत, ती शतायुषी व्हावी असे मला वाटते," असे पलक म्हणाली.
पलक तिवारीच्या बाजूने जान्हवी कपूर, सुहाना खान, अनन्या पांडे अशा काही अभिनेत्री असल्याचे बोलले जाते. या संदर्भात आम्ही अनन्या पांडे हिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. "श्वेता आजही आमच्या हृदयात आहे, ती आजही आमचे श्रद्धास्थान आहे. पण तिच्याभोवती डिपनेक गाऊन, आणि बिकिनी विक्रेत्यांच्या गराडा पडला आहे," अशी भावनिक प्रतिक्रिया दिली..






ह्यो रिपोर्टर कोण? श्वेता तिवारीच्या गल्लीत राहतो का?
ReplyDeleteया पोस्टचा राजकारणाशी दूर दूर पर्यंत संबंध नाही😂😂😂😂
ReplyDeleteYe kaun reporter hai janaab ??
ReplyDelete